भास्कराचार्य Print E-mail
यांच्या द्वारा - श्रीकांत नारायण   


आपल्या देशात अगदी वेदकाळापासून गणिताचा अभ्यास आणि त्यावरील संशोधन चालू आहे. गणितासारखा रुक्ष आणि अवघड विषय आपल्या प्रतिभेद्वारे ज्यांनी रंजक करण्याचा प्रयत्न केला त्या प्रख्यात गणितीचे नाव होते भास्कराचार्य. भास्कराचार्य हे केवळ गणिततज्ज्ञ व खगोल अभ्यासक नव्हते तर त्यांनी त्यांच्या आधी होऊन गेलेल्या अनेक गणिततज्ज्ञांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यातील त्रुटी तर दूर केल्याच शिवाय स्वतंत्र ग्रंथरचनाही केली.

अशा या भास्कराचार्याचा जन्म इ. स. १११४ साली झाला. त्यांचे वडील महेश्वर हेच त्यांचे गुरू होते. त्यांच्याजवळून बीजगणिताचे पाठ घेऊन भास्कराचार्यानी बीजगणित हा ग्रंथ लिहिला तर वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. ज्यामध्ये लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय व गोलाध्याय हे चार प्रमुख खंड होते. परंतु पुढे प्रत्येक खंड हाच स्वतंत्र ग्रंथ मानला गेला. भास्कराचार्य हे कवीही होते.

आपल्या ‘लीलावती’ ग्रंथाच्या शेवटी ते स्वत:च म्हणतात, ज्याने (म्हणजे भास्कराने) आठ व्याकरणग्रंथ, पाच भरत शास्त्रे, दोन मीमांस व पाच गणितग्रंथ अभ्यासले आहेत व जो मानतो की परब्रह्माचा महिमा अनाकलनीय आहे तो कवी भास्कर या ग्रंथाचा (लीलावती) कर्ता आहे. लहान वयातच भास्कराचार्यानी किती विद्याभ्यास केला होता हे यावरून कळून चुकते.

श्रीकांत नारायण, Loksatta

 
Type in:

आपलं स्वागतRocketTheme Joomla Templates